कसं सांगू तुझं माझ्यासाठी स्पेशल असणं
जेव्हा तुझ्याशी बोलतो
असं वाटतं तुलाच ऐकावं
म्हणून मी जास्तीत जास्त बोलायचं टाळतो
कसं सांगू तुझं माझ्यासाठी स्पेशल असणं
जेव्हा आपली भेट होते
तेव्हा तुलाच बघत रहावं वाटत
जणू माझ्या डोळ्यांचा प्रवास तुझ्यापाशीच संपतो
कसं सांगू तुझं माझ्यासाठी स्पेशल असणं
कधीतरी आपलं भांडण होतं
त्यात पण तू किती गोड भांडतेस
तुझ्यावरच्या प्रेमापोटी मीच माघार घेतो
कसं सांगू तुझं माझ्यासाठी स्पेशल असणं
काही खरेदी करतानाही तूच समोर असते
चंद्र तारे तर नाही ना आणू शकत
निदान बाजारातील एक भेटवस्तू तुझ्यासाठी घेतो
शेवटी मी तुझा विचार करतो
तेव्हा पूर्ण तुझाच होऊन जातो
किती ते प्रेम,विश्वास तुझं माझ्यावर आणि माझं तुझ्यावर
आता अजून किती सांगू तुझं माझ्यासाठी स्पेशल असणं !
वाह ..स्पेशल लोकांची स्पेशल कविता 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteमस्तच आहे 😊
एकदम मस्तच रचना 👌👌👌👌
ReplyDeleteबहुत सुंदर!✍️👌👌👌
ReplyDeleteखरंच स्पेशल कविता आहे...👌👌👌👍✍️🍫🌹
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना ������
ReplyDelete👌👌👌👍👍👍
ReplyDelete