Welcome to "Yogesh Chavan"

Welcome to "Yogesh Chavan" Welcome to-“Yogesh Chavan Blogger " तुमचे स्वागत करत आहे.- Kavyapushpa.Kavi- “Yogesh Chavan" Thanks..! .

Monday, October 11, 2021

ती (स्त्री)

ती अल्लड, ती खट्याळ, 
ती बहिण, ती पत्नी, 
ती समजुतदार, ती दयावान,
ती मैत्रीण, ती आई, 
ती रागीट, ती प्रेमळ, 
ती प्रेयसी, ती आजी, 
ती हट्टी, ती त्यागी, 
ती मुलगी, ती सून, 
तिचे वागणे हे गूढ अंतरीचे 
कसे उमजावे भाव तिच्या मनीचे ?

Sunday, October 10, 2021

दूर दूर चालली

दूर दूर चालली ती माया
जी दिली होती विश्वासाने सगळ्यांनी;

दूर दूर चालला तो विश्वास
जो दिला होता सर्व नात्यांनी;

दूर दूर चालले ते नाते
जे घट्ट विणलेले प्रेमाने;

आणि दूर दूर निघून गेले ते प्रेम
ज्यात विष पेरले वाळवंटातल्या
निवडुंगाने.....

Saturday, October 9, 2021

" कस सांगू "

कसं सांगू तुझं माझ्यासाठी स्पेशल असणं
जेव्हा तुझ्याशी बोलतो
असं वाटतं तुलाच ऐकावं
म्हणून मी जास्तीत जास्त बोलायचं टाळतो

कसं सांगू तुझं माझ्यासाठी स्पेशल असणं
जेव्हा आपली भेट होते
तेव्हा तुलाच बघत रहावं वाटत
जणू माझ्या डोळ्यांचा प्रवास तुझ्यापाशीच संपतो

कसं सांगू तुझं माझ्यासाठी स्पेशल असणं
कधीतरी आपलं भांडण होतं
त्यात पण तू किती गोड भांडतेस
तुझ्यावरच्या प्रेमापोटी मीच माघार घेतो

कसं सांगू तुझं माझ्यासाठी स्पेशल असणं
काही खरेदी करतानाही तूच समोर असते
चंद्र तारे तर नाही ना आणू शकत
निदान बाजारातील एक भेटवस्तू तुझ्यासाठी घेतो

शेवटी मी तुझा विचार करतो
तेव्हा पूर्ण तुझाच होऊन जातो
किती ते प्रेम,विश्वास तुझं माझ्यावर आणि माझं तुझ्यावर
आता अजून किती सांगू तुझं माझ्यासाठी स्पेशल असणं !

Monday, October 4, 2021

"तू असावी सोबतीला"


जेव्हा विचार येतो मनात कोणी असावे आसपास
तेव्हा वाटते तू असावी सोबतीला..

नदीकाठी बसतो एकटा
पाण्याचा प्रवाह पाहत असतो
तेव्हा वाटते तू असावी सोबतीला..

रात्रीच्या शांत वेळी
आकाशात चांदण्या पाहतो
तेव्हा वाटते तू असावी सोबतीला..

कोणताही प्रवास करताना
खिडकीतून बाहेर डोकावतो
तेव्हा वाटते तू असावी सोबतीला..

आई वडील सांगतात
बाळा लग्नाचं वय झालं
तेव्हा आपसूकच मनात येतं
तूच असावी सोबतीला.....

ती (स्त्री)

ती अल्लड, ती खट्याळ,  ती बहिण, ती पत्नी,  ती समजुतदार, ती दयावान, ती मैत्रीण, ती आई,  ती रागीट, ती प्रेमळ,  ती प्रेयसी, ती आजी,  ती हट्टी, त...